Top 3 Biggest Railway Station In India | भारतीयांसाठी रेल्वे हा प्रवासाचा अत्यंत सोयीचा आणि खिशाला परवडणारा मार्ग आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सामन्यापासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत रेल्वेचा पर्याय निवडला जातो. आपण ज्या ठिकाणावरून जाणार आहोत. त्या ठिकाणचे स्थानक नेहमीच महत्वाचे असते. भारतामध्ये अनेक रेल्वे स्थानक आहेत. मात्र तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे की, भारतामध्ये एवढे मोठे रेल्वे स्थानकं आहेत. पंरंतु या स्थानकमध्ये सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते आहे? तुम्हाला याबाबत नसेल माहिती तर चला मग जाणून घेऊयात भारतातील सर्वात मोठी ३ रेल्वे स्थानके … देशातील सर्वात मोठ्या ३ रेल्वे स्थानकांमध्ये यामध्ये हावडा रेल्वे स्थानक, सियालदह आणि मुंबईतील CSMT यांचा समावेश होतो. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की असं या ठिकाणी काय आहे. जे या स्थानकांचा देशातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकामध्ये समावेश होतो. चला तर मग जाणून घेउयात …
1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजेच CSMT हे रेल्वे स्टेशन देशातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकपैकी एक असून हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे स्थानक आहे. या स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर त्याचे CST असे नाव ठेवण्यात आले आणि आता या स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT म्हणून ओळखले जाते. या स्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कुठेही जायचे असेल. तिथे येथून गाड्या उपलब्ध असतात. तसेच स्थानकावर एकूण 18 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे देशातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकापैकी (Top 3 Biggest Railway Station In India) एक आहे.
2) सियालदह : Top 3 Biggest Railway Station In India
सियादल हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक असून पश्चिम बंगालमधील आहे. सियादल स्थानकावर नेहमीच प्रवाश्यांची गर्दी असते. या रेल्वे एकूण स्थानकावर 20 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. या स्थानकावरूही तुम्हाला देशाच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी गाडी आहे.
3) हावडा रेल्वे स्थानक :
हावडा रेल्वे स्थानक हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक (Top 3 Biggest Railway Station In India) असून हे रेल्वे स्टेशन सुद्धा पश्चिम बंगाल मधील मध्ये आहे. कोलकत्यामधील हे रेल्वे स्थानक स्वातंत्र्यपूर्वपासून प्रवाश्यांच्या सेवेत आहे. या स्थानकावर एकूण 23 प्लॅटफॉर्म असून स्थानकावर 26 ट्रॅकची रेल्वे लाईन देखील टाकण्यात आली आहे. त्यामुळे हे रेल्वे स्थानक हे देशातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. दररोज लाखो लोक ये- जा करत असतात. त्यामुळे हे भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे.