हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Forbes Richest Women : नुकतीच फोर्ब्सकडून भारतातील देशातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये भारतातील अनेक महिलांनाही स्थान मिळवण्यात यश आले आहे. फोर्ब्सच्या या लिस्टमध्ये ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदाल यांचे नावही सामील आहे. त्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत.
हे जाणून घ्या कि, या लिस्टमध्ये अशा महिलांचीही नावे सामील आहेत ज्यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून काम सुरू करून फोर्ब्समध्ये स्थान मिळवले आहे. चला तर मग आणखी कोण-कोणत्या महिलांचा या लिस्टमध्ये समावेश झाला आहे आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात….
सावित्री जिंदाल
फोर्ब्सच्या सर्वांत श्रीमंत महिलांच्या लिस्टमध्ये सावित्री जिंदाल यांचे नाव आघाडीवर आहे. त्या 73 वर्षांच्या आहेत. त्याचप्रमाणे फोर्ब्सच्या रियल टाईम अब्जाधीशांच्या लिस्टमध्येही त्या 94व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 17 अब्ज डॉलर्स इतकी आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल मात्र सावित्री या कधीही शाळेची पायरी चढलेल्या नाहीत, तरीही जिंदाल ग्रुपच्या स्टीलचा व्यवसाय वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. Forbes Richest Women
रोशनी नादर मल्होत्रा
फोर्ब्सच्या सर्वांत श्रीमंत महिलांच्या लिस्टमध्ये रोशनी नाडर मल्होत्रा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. HCL च्या चेअरपर्सन असलेल्या रोशनी यांची एकूण संपत्ती 84, 330 कोटी रुपये इतकी आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या लिस्टमध्ये त्यांचे वडील शिव नाडर हे भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. Forbes Richest Women
रेखा झुनझुनवाला
दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या फोर्ब्सच्या सर्वांत श्रीमंत भारतीय महिलांच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंतांच्या लिस्टमध्येही त्या 30 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर्स इतकी आहे. Forbes Richest Women
फाल्गुनी नायर
महिलांसाठी ब्युटी प्रॉडक्ट बनवणाऱ्या Nykaa च्या संस्थापिका आणि CEO असलेल्या फाल्गुनी नायर या श्रीमंत महिलांच्या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांच्याकडे एकूण $2.7 अब्जची संपत्ती आहे. Nykaa मध्ये फाल्गुनी नायर यांची 50% हिस्सेदारी आहे. Forbes Richest Women
किरण मुझुमदार शॉ
फार्मा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मुझुमदार शॉ या आहेत. त्या दीर्घकाळापासून देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या लिस्टमध्ये सामील आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती $2 अब्ज आहे. हे लक्षात घ्या कि, कोरोना काळामध्ये या कंपनीने सर्वाधिक कमाई केली आहे. Forbes Richest Women
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.forbes.com/sites/gabrielalopezgomes/2023/04/04/the-worlds-richest-female-billionaires-2023/
हे पण वाचा :
Bank Loan : तुम्ही सुद्धा कर्जामुळं बेजार झालाय का? ‘हे’ 5 अधिकार जाणुन घ्या अन् निवांत रहा..
NMACC : 5 Star Hotel पेक्षा काही कमी नाही निता अंबानींची ‘ही’ वास्तू; प्रवेश फी केवळ Rs.199
Donald Trump यांनी पोर्नस्टारला पैसे दिले? नक्की काय आहे Hush Money प्रकरण
Smartphone च्या स्पीकरमध्ये साचली आहे घाण, ‘या’ 3 Tricks वापरून करा साफ
ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..