Personal Loan हवं आहे चिंता करू नका; ‘या’ बँका देतायेत झटपट स्वस्तात लोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात पैसा हा खूप महत्वाची गोष्ट आहे. याशिवाय आपण काहीही करू शकत नाही कारण दैनंदिन जीवनात गरजा भागविण्यासाठी प्रत्येकाला पैशांची खूप गरज भासत असते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीना कधी अतिरिक्त पैशांची गरज भसते, त्याची कारणे अनेक असू शकतात. अशावेळी संबंधित व्यक्ती (personal loan) पर्सनल लोनचा पर्याय निवडतो. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांची माहिती देणार आहोत ज्या बँकांनी पर्सनल लोनसाठी आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर दिलया आहेत.

अचानक गरज भासल्यास काही अशा बँका आहेत कि तुम्हाला अत्यंत कमी व्यजदरात पर्सनल लोन देऊ शकतात. यामध्ये खासकरून तीन बँकांचा समावेश होतो.

HDFC Bank

HDFC Bank 

एचडीएफसी बँकेने पर्सनल लोनसाठी त्यांच्या ग्राहकांना चांगली ऑफर दिली आहे. सध्या बँकेमध्ये आपल्या ग्राहकांना 10.5 ते 21 टक्के व्याज दराने पर्सनल लोन देत आहे. हा व्याज दर 5 वर्षांसाठी तब्ब्ल 40 लाख रुपयांपर्यंत दिल्या जाणाऱ्या लोनवर आहे.

Kotak Mahindra Bank

Kotak Mahindra Bank

कोटक महिंद्रा बँकेने तुम्ही जर इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला बँकेकडून 10.99 टक्के व्याजदराने पर्सनल लोन ऑफर करण्यात आली आहे. हा व्याजदर 5 वर्षांच्या कालावधीसाठी असून हा व्याजदर 25 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेसाठी देण्यात आला आहे.

Punjab National Bank

Punjab National Bank

पंजाब नॅशनल बँकेकडूनही पर्सनल लोनची ऑफर आपल्या ग्राहकांना देण्यात आलेली आहे. हि ऑफर 20 लाख रुपये इतक्या रक्कमेसाठी देण्यात आली असून या रक्कमेच्या बदल्यात 10.5 टक्के व्याजदर द्यावा कागणार आहे.

State Bank of India

State Bank of India

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पर्सनल लोनसाठी एक ऑफर देण्यात आलेली आहे. बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी 30 लाख रुपयांच्या रक्कमेवर 10.65 टक्के व्याजदर देखील दिला जात आहे. हे कर्ज एकूण 6 वर्षांपर्यंत घेतले जाऊ शकते.

Personal loan

वैयक्तिक कर्ज म्हणजे काय?

वैयक्तिक कर्ज खरं तर असुरक्षित कर्ज आहे, याचा अर्थ सोने आणि गृहकर्ज यांसारख्या जमा करण्यासाठी कोणत्याही तारण किंवा तारणाची आवश्यकता नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर कर्जदाराला कोणतीही हमी घेण्याची किंवा काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारणपणे 12 ते 60 महिन्यांचा असतो. गृहकर्ज किंवा वाहन कर्जाच्या विपरीत हे कर्ज वैद्यकीय आणीबाणी, लग्न किंवा शिक्षण खर्च यासारख्या कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

व्याजदरानुसार निवडा

वैयक्तिक कर्ज घेताना व्याजदर निश्चितपणे जाणून घ्या. कारण वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जापेक्षा जास्त असतात. ते 10 ते 24 टक्क्यांपर्यंत असू शकते. व्याजदर जितका जास्त असेल तितका तुमचा EMI जास्त असेल. अशा स्थितीत सर्वप्रथम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पर्सनल लोन जिथून सर्वात कमी व्याजदर असेल तेथून घ्या.

‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

1) कधीही घाईगडबडीत पर्सनल लोन घेऊ नका. कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही बँकेच्या काही शाखांना भेट देऊन माहिती गोळा करा किंवा पर्सनल लोनचे व्याजदर जाणून घेण्यासाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. व्याज कमी असेल तिथून कर्ज घ्या.

2) कर्ज घेतल्यानंतर, वेळेवर ईएमआयची परतफेड करा. वेळेवर कर्जाचे हप्ते न भरल्यास याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. क्रेडिट स्कोअर कमी असल्यास भविष्यात कर्ज घेताना समस्या येऊ शकते.

3) गरज नसताना जास्त कर्ज घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर मोठा ईएमआय भरावा लागेल आणि त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. जितकी रक्कम तुम्ही सहज फेडू शकता तितकेच कर्ज घ्या. बँकेच्या साइटवर सध्याच्या ईएमआय कॅल्क्युलेटरवरून तुम्हाला किती ईएमआय द्यावा लागेल याची माहिती घेऊ शकता.

4) दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेणं टाळा. हे नक्कीच तुमचा हप्ता कमी करेल, परंतु त्या बदल्यात तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. कमी कालावधीचा हप्ता मोठा असेल, पण त्यावर जास्त व्याज लागणार नाही.

5) फ्लॅट रेटच्या फंदात कधीही पडू नका, हा ग्राहकांची दिशाभूल करण्याचा मार्ग आहे. तुमच्या कर्जाचा हप्ता केव्हा महागणार आहे याची तुम्ही कधीही माहिती घेऊ शकत नाही.