Top Rich City In Maharashtra : महाराष्ट्रातलं दुसरं श्रीमंत शहर ! ज्याचा GDP जवळपास 69 अब्ज डॉलर्स इतका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top Rich City In Maharashtra : आपल्याला माहितीच आहे की जगभरात भारताचा डंका अनेक गोष्टींमध्ये आहे. श्रीमंतांच्या यादीत देखील भारताचे सदस्य आहेत. याशिवाय आपलं महाराष्ट्र ही काही मागे नाही. महाराष्ट्र हे भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर हजारो शहर आहेत यापैकी सर्वात श्रीमंत शहर कुठलं? तर सर्वात श्रीमंत शहर म्हणजे ‘आपली मुंबई’… देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि या मुंबईचा तामझाम याचं काही वेगळं उदाहरण देण्याची गरज नाही. पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावरचं सर्वात श्रीमंत शहर कोणतं आहे बरं? महाराष्ट्रातलं दोन नंबरचं जे सर्वात श्रीमंत शहर आहे आजच्या लेखामध्ये आपण त्याचीच (Top Rich City In Maharashtra) माहिती घेणार आहोत.

मुंबईपाठोपाठ राज्यामध्ये सर्वात श्रीमंत शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक आहे. मुंबईच्या पाठोपाठ पुणे सर्वाधिक औद्योगीकरण झालेलं महाराष्ट्रातलं दुसरं शहर आहे सर्वात मोठा आयटी हब पुण्यात आहे. याशिवाय बजाज ऑटो, टाटा मोटर्स यासारख्या बड्या कंपन्यांचे प्लांट देखील पुण्यात आहेत. पुण्याचा जीडीपी 69 अब्ज डॉलर्स इतका (Top Rich City In Maharashtra) आहे

शिवाय आपल्याला माहितीच असेल पुण्याला शिक्षणाची पंढरी असं म्हटलं जातं त्यामुळे देश-विदेशातून इथं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात याशिवाय कुणाला संस्कृतिक वारसा सुद्धा लाभलेला आहे पुणे ऐतिहासिक शहर देखील आहे. आता भारतात पुण्याचा कितवा नंबर लागतो याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत पुण्याचा (Top Rich City In Maharashtra) क्रमांक सातवा आहे.

जगातील श्रीमंत शहराच्या यादीत मुंबईचा समावेश होतो तर इंटरनॅशनल सिटी अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई हे शहर महाराष्ट्राचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. शिवाय मुंबईमध्ये भारताच्या दहा टक्के रोजगार, 40% प्राप्ती कर, 20 टक्के केंद्रीय कर, 60% आयात कर, 40% परदेशी व्यापार आणि जवळपास 40 अब्ज व्यावसायिक कर हा एकट्या मुंबईतून (Top Rich City In Maharashtra) येतो.

देशविदेशातील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालय मुंबईत आहेत याशिवाय मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा गोदरेज आणि रिलायन्स ग्रुप अशा बड्या उद्योग समूहांचा हेड ऑफिस मुंबई (Top Rich City In Maharashtra) मध्ये आहे.