हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tourism In Maharashtra । पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जाग झालं आहे. पुण्यातील धोकादायक पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अधिकाऱ्यांना पावसाळ्यात धोकादायक पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यास सांगितलं आहे. केवळ सूचना फलक पुरेसे नाहीत तर दुरुस्ती आणि सुरक्षितता उपाययोजना पूर्ण होईपर्यंत संवेदनशील भाग बंद ठेवावेत असं सौनिक यांनी म्हंटल.
सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई – Tourism In Maharashtra
कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आढावा घेतला. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर सुजाता सौनिक यांनी धोकादायक पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले. पावसाळ्यात काही पर्यटन स्थळांवर (Tourism In Maharashtra) मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशा ठिकाणी प्रशासनाने सतर्क राहावे. “जर धोका असेल तर तात्पुरती प्रवेश बंदी घालण्यात यावी असं सुजाता सौनिक म्हणाल्या. तसेच सुरक्षिततेच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करायला हवी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
क्षेत्रनिहाय जबाबदारी प्रणालीची मागणी करत, सुजाता सौनिक यांनी प्रशासनाला गर्दी नियंत्रणासाठी आणि जमिनीवर दक्षतेसाठी मदत करण्यासाठी होमगार्ड्स आणि एनसीसी कॅडेट्सना सहभागी करून घेण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) सार्वजनिक रस्त्यांवरील सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्याचे आणि आवश्यकतेनुसार जुन्या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याचे निर्देशही दिले. पावसाळी पर्यटनात मोठी वाढ होत असलेल्या पुणे विभागात विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सौनिक यांनी म्हंटल. Tourism In Maharashtra
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ५० हुन अधिक पर्यटन जखमी झाल्याचं बोललं जातंय. अजूनही काही जणांचे शोधकार्य सुरु आहे. ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं होते. नसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेवर सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.




