कोरोनाव्हायरसची भीती वाढली; सौदीवरून 40 पर्यटक कोल्हापूरात परतले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | सतेज औंधकर

कोरोनाव्हायरसची भीती जगभर पसरली असतानाच सौदीवरून कोल्हापुर परिसरातील 40 पर्यटक आज पहाटे घरी परतले आहेत. कोल्हापूरात स्क्रिनिंग न करताच पर्यटक परस्पर घरी गेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. हे सर्व पर्यटक कोल्हापूर, सातारा, सांगली, निपाणी, बेळगाव परिसरातील असून आज पहाटे ते घरी परतले आहेत.

दिल्ली नंतर कोल्हापुरात प्रशासनाकडून स्क्रिनींग करण्याची गरज असताना चेकिंग न करताच पर्यटक परस्पर घरी गेले आहेत. दिल्लीमध्ये या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती टुरिझम कंपनीच्या वतीने देण्यात आली. परस्पर घरी गेलेल्या पर्यटकांची यादी जिल्हा प्रशासनाने टुरिझम कंपनीकडून मागवली आहे.