कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एक कार थेट नदीमध्ये कोसळली (car fell into river)आहे. हि घटना कोल्हापूरातील चंदगड तालूक्यातील मजरे कारवे या ठिकाणी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बेळगाव-वेंगुर्ला रोडवर शुक्रवारी सांयकाळी मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावर पाच वाजताच्या सुमारास ही घटना (car fell into river) घडली आहे.
दुचाकीस्वाराला वाचवण्याचा नादात दाम्प्त्यासह नदीत कोसळली कार pic.twitter.com/wTHRheYbHj
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 16, 2022
काय घडले नेमके ?
कल्लाप्पा बाणेकर , रेश्मा बाणेकर हे दाम्पत्य आपल्या गावी मुरकुटेवाडीकडे निघालं होतं. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविताना कलाप्पा यांचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार बेळगाव-वेंगुर्ला रोडवर असलेल्या हांजहोळ नदीजवळील पुलाजवळून नदीत कोसळली(car fell into river). सुदैवाने घटना घडली तेव्हा तिथे काही लोक उपस्थित होते. हे सगळं बघताच तडशिनहाळचे उपसरपंच रामलिंग गुरव आणि बेळगाव येथील दोन पर्यटक यांनी क्षणाचीही विचार न करता नदीत उतरुन कारमधील दाम्पत्याला (car fell into river) बाहेर काढलं.
कल्लाप्पा बाणेकर हे शिनोळी येथील कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीतील कल्लाप्पा यांच्या सहकाऱ्यांना याबाबत समजताच त्यांनी घटनास्थळी धाव (car fell into river) घेतली. संगम पाटील आणि बिर्जे यांनी मोठे धाडस करत वाहून जाणारी कार दोरीने झाडाला बांधली. त्यानंतर कार नदीतून काढण्याचा (car fell into river) प्रयत्न करण्यात आला मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना यश आले नाही. मात्र सुदैवाने या कारमधील दाम्प्त्याचा जीव वाचला आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर