टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

vikram kirloskar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे.

टोयोटाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष श्री. विक्रम एस. किर्लोस्कर यांचे अकाली निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करावी अशी विनंती करतो.आम्ही त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे अंतिम श्रद्धांजली अर्पण करता येईल अशी माहिती कंपनीने दिली आहे.

दरम्यान, विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शोक व्यक्त केला आहे. भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगातील दिग्गजांपैकी एक, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांच्या दुःखद आणि अकाली निधनाने खूप दुःख झाले. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची ईश्वर कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला शक्ती देवो असं ट्विट त्यांनी केलं आहे.