TVS Apache RTR 160 4V चे स्पेशल एडिशन लॉंच; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS Motors ने आपली (TVS Apache RTR 160 4V) लोकप्रिय बाईक TVS Apache चे नवीन स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सुसज्ज असलेल्या या बाईकमध्ये कंपनीने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत, ज्यामुळे ती नेहमीच्या मॉडेलपेक्षा खूपच चांगली बनते. यात काही नवीन फर्स्ट-इन-सेगमेंट वैशिष्ट्ये देखील मिळतात. या बाईकची खास गोष्ट म्हणजे यात ‘बुलपअप’ एक्झॉस्ट (सायलेन्सर) देण्यात आला आहे. कंपनीने हे स्पेशल एडिशन एका नवीन पर्ल व्हाईट रंगात लॉन्च केले आहे.

TVS Apache RTR 160 4V

लूक आणि फीचर्स –

या बाईकला लाल आणि काळ्या रंगाचे अलॉय व्हील मिळतात. सीटची रचना काळ्या आणि लाल रंगात करण्यात आली आहे. याशिवाय त्याला एक नवीन पॅटर्न मिळाला आहे. TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशनवर SmartXonnect देखील ऑफर करत आहे जी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. यातील इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इतर सामान्य माहितीशिवाय गियर शिफ्ट इंडिकेटर देखील दर्शवू शकतो. ब्रेकिंग साठी समोर 270 mm पाकळी डिस्क आणि मागील बाजूस 200 mm पाकळी डिस्क आहे.

TVS Apache RTR 160 4V

बुलपअप एक्झॉस्ट-

Apache RTR 160 4V ला नवीन एक्झॉस्ट मिळतो. TVS ने याला ‘बुलपअप एक्झॉस्ट’ असे नाव दिले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा नवीन एक्झॉस्ट थोडा मोठा दिसू शकतो, परंतु त्याचे वजन मानक मॉडेलच्या एक्झॉस्टपेक्षा जवळजवळ 1 किलो कमी आहे. यामुळे बाईकचा पॉवर-टू-वेट रेशो सुधारतो आणि बाईकच्या एक्झॉस्ट नोट (सायलेन्सरचा आवाज) देखील सुधारतो.

TVS Apache RTR 160 4V

इंजिन – (TVS Apache RTR 160 4V)

या बाईकला 159.7 cc, ऑइल-कूल्ड, SOHC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9,250 rpm वर 17.30 bhp चा सर्वोत्तम पॉवर आउटपुट आणि 7,250 rpm वर 14.73 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत (TVS Apache RTR 160 4V) 5-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.यामध्ये 3 राइडिंग मोड मिळतात – अर्बन, स्पोर्ट आणि रेन. अर्बन आणि रेन मोडमध्ये, गाडीचे टॉप स्पीड 103 किमी ताशी मर्यादित आहे, तर स्पोर्ट मोडमध्ये टॉप स्पीड 114 किमी प्रतितास पर्यंत वाढतो.

किंमत –

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, TVS च्या या बाईकची किंमत 1,30,090 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि हि गाडी आता सर्व अधिकृत डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हे पण वाचा :

Bajaj Pulsar 125 चे नवीन मॉडेल भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Electric Bike : 307 किमी मायलेज देणारी Electric Bike लॉन्च; पहा किंमत

Royal Enfield ची क्रूजर बाइक लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास

Jawa 42 Bobber : दमदार लूक आणि फीचर्ससह लॉन्च झाली Jawa 42 Bobber; पहा किंमत