हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाची (Toyota RAV4) नवी SUV RAV-4 लवकरच भारतीय बाजारात येऊ शकते. टोयोटाची ही एसयूव्ही हायब्रिड पेट्रोल इंजिन वर आधारित असण्याची शक्यता आहे. Toyota RAV-4 ची किंमत अंदाजे ५० ते 60 लाख रुपये पर्यंत असू शकते. चला जाणून घेऊया या RAV-4 SUV बद्दल…
Toyota RAV-4 ची लांबी 4600mm, रुंदी 1855mm, तसेच उंची 1685mm आणि व्हीलबेस 2690mm एवढा आहे. हे टोयोटा (Toyota RAV4) न्यू ग्लोबल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यानुसार या SUV मध्ये चांगली विजिबिलिटी,हैंडलिंग,रिस्पॉन्सिव स्टीयरिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत आणि या SUV मुळे प्रदूषणही होणार नाही.
इंजिन- (Toyota RAV4)
Toyota RAV4 Hybrid च्या इंजिनबद्दल (Toyota RAV4) बोलायचे झाले तर, यात 2.5 लीटर, चार सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे या पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर जोडली जाईल असे म्हणलं जात आहे. इंजिन आणि मोटर दोन्ही मिळून 2-व्हील ड्राइव्ह व्हर्जन मध्ये 218 Bhp आणि ऑल-व्हील ड्राइव्ह व्हर्जन मध्ये 222 Bhp पॉवर जनरेट करेल .
रिपोर्टनुसार, टोयोटाच्या या RAV4 ला भारतात फक्त २५०० युनिट कोटा अंतर्गत इम्पोर्ट केले जावू शकते. ज्यात होमोलॉगेशनची गरज नाही. यात नवीन प्रोडक्टला शो रुम पर्यंत आणण्याची वेळ वाचवण्यासाठी त्याची किंमत कमी करण्यास मदत मिळू शकते.
किंमत-
Toyota RAV-4 ची (Toyota RAV4) किंमत अंदाजे ५० ते 60 लाख रुपये पर्यंत असू शलते आणि भारतीय बाजारपेठेत या नव्या SUVची स्पर्धा Honda CR-V आणि Citroen C5 Aircross शी होईल.