कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मान्सून पावसाचे आगमन जोरदार सुरू झाले आहे. या पावसाने हाहाकार सुरू केला असताना कराड तालुक्यातही रात्रभर जोरदार बॅंटीग केलेली आहे. त्यामुळे कराड शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. तर शहराजवळील मलकापूर व गोटे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूकींचा काही काळ खोळंबा झालेला होता.
कराड तालुक्यात काल रात्रभर झालेल्या तसेच गुरूवारी पहाटे सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचलेले आहे. अनेक ठिकाणी लहान वाहनांसह मोठ्या वाहनांनाही कसरत करावी लागत आहे. मलकापूर येथे कृष्णा हाॅस्पीटल व डी- मार्ट या मार्गावर पाणी आलेले आहे. तर गोटे गावाजवळही मुख्य राष्ट्रीय मार्गावर पाणी आलेले आहे. यामुळे काही काळ लहान वाहनांना वाहतूक बंद ठेवण्यात आलेली होती.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2952238855032568
सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका कराड तालुक्याला बसला असून शहरातही पाणी साचलेले होते. शहरातील अनेक दुकांनात पाणी शिरले. तर नालेही तुंबलेली दिसून येत होती. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहन चालकांसह रस्त्यांवर चालणाऱ्यांनाही पाण्यातून मार्ग काढावा लागत होता.