औरंगाबादेत वाहतूक पोलिसांची दादागिरी कॅमेरात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबादेत प्रतिनिधी | वाहतूक पोलिसांची दादागिरी कॅमेरात कैद झाली आहे. दंडाची रक्कम नसल्याने तरुणाने ऑनलाइन घरपोच पावती मागितल्याने संतापलेल्या वाहतूक पोलिसांनी मारहाण करीत दुचाकी जप्त केली. या घटनेमुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे अात्सुक्याचे ठरणार आहे.

औरंगाबाद शहरात भर रस्त्यावर वाहनाचा बाजार मांडला आहे. निम्म्याहून अधिक रस्ता वाहनांनी व्यापल्याने रस्त्यांना वाहनतळाच स्वरूप प्राप्त झाले आहे.वर्षनुवर्षं ही स्क्रॅप वाहने रस्त्यावर पडून आहेत. महावीर चौक ते चिकलठाणा या औरंगाबादच्या मुख्य रस्त्यावर रोज शेकडो मुजोर आप्पे रिक्षाचालक कशा पद्धतीने आणि किती नियमात राहून रिक्षा चालवित आहे हे सर्वश्रुत आहे मात्र वाहतूक विभाग या कडे दुर्लक्ष्य करीत आहे.आणि दुचाकीस्वारच वाहतूक पोलिसांचे खरे टार्गेट आहे असे अलीकडच्या काळात दिसत आहेत. याचाच प्रत्यय आज आला. चिकलठाणा एमआयडीसी येथील रहिवासी असलेला प्रेम रोहिदास घोडके नावाचा तरुण त्याच्या (mh20ep7938) या क्रमांकाच्या दुचाकीवरून कॅनॉट गार्डन परिसरातून प्रोझोन मॉल कडे जात असताना तेथील सिग्नलजवळ हेल्मेट घातले नसल्याने तीन वाहतूक पोलीस कर्मचार्यांनी त्यास थांबविले तोही थाम्बला मात्र त्या कडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने त्याने गाडीच्या क्रमांकाचा फोटो काढा व मला घरपोच सुविधा असलेली पावती पाठवा अशी विनंती केली मात्र पोलिसांनी त्यास नकार दिला.

दंड भरा अन्यथा गाडी जमा करू असा पवित्रा पोलिसांनी घेतला त्यावर मी गाडी सोडणार नाही असे तरुण म्हणाला मात्र पोलिसांनी त्या तरुणाचे काही एक न ऐकता दुचाकी ताब्यात घेत त्या दुचाकीला विनाचावी खालून वायर काढत डायरेक्ट केली.व विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण केली हा सारा प्रकार तरुणाने मोबाईल कैद केला आहे. व मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचारी विरोधात सिडको ठण्यात तक्रार दिली.