Traffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद :वृत्तसंस्था – आजकाल नागरिक सर्रासपणे वाहतुकीचे नियम (traffic rule) उल्लंघन करताना आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने त्याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. वाहतुकीचे नियम (traffic rule) उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी जर जाब विचारला तर वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याच्या प्रकरणे आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर हैदराबाद येथील अशाच पद्धतीचा व्हिडिओ जोरात वायरल होत आहे.

https://twitter.com/RameshVaitla/status/1576914522312507393

तेलंगणा येथील निरपेटच्या मैत्री वन मध्ये ही घटना असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक व्यक्ती स्वतःच्याच बाईकवर पेट्रोल टाकून त्याला पेटवतो आहे. संपूर्ण माहिती अशी की ही व्यक्ती जवळच आपल्या फोनच्या दुकानात आला होता आणि तो व्यक्ती रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवत होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन (traffic rule) केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवले. या कारणाने ती व्यक्ती संतप्त झाली आणि मारहाण करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीने दुकानात जाऊन इंधन घेऊन आले आणि आपल्या गाडीवर ते इंधन टाकून त्याला आग लावली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर रमेश विठ्ठला यांनी ट्वीटर अकाउंट वर शेअर केला आहे. या घटनेनंतर ट्राफिक पोलिसांनी (traffic police) तात्काळ तेथील पोलीस स्टेशनला संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!