दुःखद निधन : जेवणाचे ताट करायला सांगितले अन् अशोकराव भावकेंना कारने उडविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तालुक्यातील घोगाव येथील संतकृपा शिक्षण संस्था आणि मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव जग्गनाथ भावके (वय-52) यांचे मंगळवारी रात्री अपघातात निधन झाले. घोगाव गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर उभे असताना त्याना कारने 11 वाजण्याच्या सुमारास धडक दिली. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, घोगाव येथील संतकृपा काॅलेज समोर अशोक भावके यांचे मातोश्री हाॅटेल आहे. तेथे जेवणाचे ताट तयार करायला सांगून रस्त्यावर फोनवरती बोलत आले असता अज्ञात चारचाकीने जोराची धडक दिली. यामध्ये ते डांबरी रस्त्यावर पडले, तेव्हा हाॅटेलमध्ये असलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने कृष्णा हाॅस्पीटल, कराड येथे आणले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशोक भावके यांच्या कन्या आॅस्ट्रेलिया येथे असल्याने कन्या आल्यानंतर उद्या गुरूवारी दि. 17 रोजी जन्मगाव घोगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अशोकराव भावके यांनी 1995 ला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून स्व. विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांच्या विरोधात शिवेसनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तेथून त्यांच्या राजकारणाची सुरूवात झाली. त्यानंतर त्यानी संतकृपा शिक्षण संस्था स्थापन केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती. मातोश्री सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना मदत केली होती. काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहून त्यानी पुणे आणि मुंबई येथे बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. काल (मंगळवारी) रात्री ते घोगाव येथे आले होते. रस्त्याच्याकडेला उभे राहिले असताना त्यांना कारने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment