पुणे | वेदिका शिंदे या चिमुरडीला अमेरिकेतून तब्बल 16 कोटींचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा जीव वाचविण्यात यश मिळालं होतं. पुण्यातील वेदिका शिंदे ही चिमुरडी जनुकीय आजाराने ग्रस्त होती. तिच्यासाठी 16 कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी वेदिकाचा मृत्यू झाला. सायंकाळी ती खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केला. मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही.
वेदिकावर उपचार व्हावेत आणि तिला महागडे 16 कोटीचं इंजेक्शन मिळावं यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप धडपड केली होती.तिच्या इंजेक्शनसाठी लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमाही करण्यात आले होते. तसेच पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. मात्र, एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत. हे ही आईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद?वेदिकाला होता असाध्य आजार वेदीका पाच महिन्यांची असताना तिला SMA टाईप-1, या जनुकीय आजारानं ग्रासल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे वय वाढण्याबरोरब तिच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होत होता. त्यामुळे उपचार करणं अत्यावश्यक होतं. या आजारावर मात करण्यासाठी झोलगेन्स्मा ही एकमेव लस उपलब्ध आहे.
पण या एका लशीची किंमत तब्बल 22 कोटी आहे. असं असताना वेदिकाच्या आई बाबानं तिला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं. वेदिकाला मदत करणाऱ्यांचे डॉ. अमोल कोल्हेंनी मानले होते आभार वेदिकावर उपचार करण्यासाठी पैशांच्या रुपात मदत करणाऱ्यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले होते. 16 जून रोजी 16 कोटींचे इंजेक्शन वेदिलाला दिल्यानंतर आनंदाचा पारावर उरला नव्हता, असं कोल्हे म्हणाले होते. वेदिकाला इंजेक्शन मिळाल्यामुळे तिच्या पालकंसह आमच्या कष्टांचं चीज झाल्याचं समाधान वाटलं असंही ते पुढे म्हणाले होते.