नवी दिल्ली । तुम्हाला माहीत आहे का की, आता तुम्ही तुमच्या आधार कार्डवर रजिस्टर्ड केलेले सर्व मोबाईल फोन नंबर तपासू शकता? होय .. तुम्ही दूरसंचार विभागाच्या (DoT) नवीन वेबसाइटवरून हे नंबर तपासू शकता. DoT ने अलीकडेच टेलीकॉम एनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे, युझर्स त्यांच्या आधार नंबरशी जोडलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात. हे एक अतिशय उपयुक्त पोर्टल आहे.
आधारद्वारे लिंक केलेल्या सिमचे पूर्ण तपशील
TAFCOP च्या मते, या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम दिले आहेत हे सहजपणे शोधू शकता. जर तुमच्या माहितीशिवाय कोणताही मोबाईल नंबर तुमच्या आधार नंबरशी जोडला गेला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचा जुना आणि न वापरलेला नंबरही सहजपणे तुमच्या आधारवरून वेगळा करू शकता. सध्या ही सर्व्हिस फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या युझर्ससाठी आहे, परंतु लवकरच ती देशभरातील युझर्ससाठी उपलब्ध केली जाईल.
विजय शेखर शर्मा म्हणाले,”उपयुक्त सेवा”
Paytm चे विजय शेखर शर्मा यांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या उपयुक्त सेवेचे कौतुक केले आहे. Paytm चे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही याबाबत ट्विट केले आहे आणि ते अतिशय उपयुक्त असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,” TRAI / Dot द्वारे सुरु केलेली अतिशय उपयुक्त सेवा. जिथे तुम्ही साईटवर जा आणि तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि OTP एंटर करताच तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकासह खरेदी केलेल्या सर्व सिम कार्डचे मोबाईल नंबर कळतील. तुम्ही वापरत नसलेले नंबर्स तुम्ही ब्लॉक करू शकता.”
रजिस्टर्ड फोन नंबर कसे तपासायचे ते जाणून घ्या-
1. तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला आधी https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जावे लागेल.
2. येथे तुम्हाला तुमचा फोन नंबर एंटर करावा लागेल.
3. यानंतर तुम्हाला ‘रिक्वेस्ट OTP’ बटणावर क्लिक करावे लागेल.
4. यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकावा लागेल.
5. त्यानंतर, तुमच्या आधार नंबरशी जोडलेले सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.
6. जिथे युझर्स वापरात नसलेल्या किंवा यापुढे आवश्यक नसलेल्या नंबरबाबत तक्रार आणि ब्लॉक करू शकतात.
TAFCOP पोर्टल मध्ये ‘या’ सुविधा पुरवल्या जातात
1. ज्यांच्या नावावर 9 पेक्षा जास्त कनेक्शन आहे अशा ग्राहकांना SMS द्वारे सूचित केले जाईल.
2. ज्यांच्या नावावर 9 पेक्षा जास्त कनेक्शन असे ग्राहक पोर्टलच्या लिंकवर क्लिक करून आवश्यक कारवाई करू शकतात.