राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; तुमच्या जिल्ह्यात कोणाची वर्णी?

Transfers of 22 Superintendents of Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट पोलीस विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग, धाराशिव, रायगड अशा बड्या जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरला झाली… तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या बदलीनंतर आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.

धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे अधीक्षक तुषार दोषी यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली आहे. अकोल्यात गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली नागपूरला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ ला करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात उप आयुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक यांची बदली करण्यात आली आहे.

खालीलप्रमाणे झाल्यात पोलीस बदल्या –

आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे पोलीस अधीक्षक, रायगड
सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड → पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
महेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
योगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
बच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला समादेशक, रा. रा. पो. बल, गट क्र. 4, नागपूर
राकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
अर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस अधीक्षक, अकोला
मंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर
राजातिलक रोशन – सहायक पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर → • पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
यतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, पालघर
सौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग → गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
मोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा → समादेशक, रा. रा. पो. बल गट क्र. 9, अमरावती