चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे
चंद्रपूर शहरातील एका व्यापाराकडे लग्नाच्या कार्यक्रमात नाच गाण्यासाठी जात असलेल्या एका किन्नारांच्या टोळीवर शहरातील कथीत किन्नरांच्या टोळीने हल्ला चढवून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याने हल्ला झालेल्या किन्नरांवर भितीचे वातावरण पसरले आहे. संबंधित घटनेबाबत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वरी रेड्डी यांना निवेदन देऊन कथीत किन्नारांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून किन्नरांचा एक गुट वास्तव्यास आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ते कोणत्याही कार्यक्रमात नाच- गाणा करुन, आपल्या शापीत आयुष्याचा रहाटगाडा पुढे ढकलत आहे. मात्र मागील काही दिवसापासून पुन्हा एक कथीत किन्नरांचा गुट सक्रिय झाला आहे.
शाम नगर येथे राहणारा राजू काचोळे हा किन्नर पंथातील “गे” समजून संबोधन ट्रस्ट नावाची संस्था सुरू केलेला आहे. मुळात त्याचे लग्न होवून त्याला एक मुलगा आहे. तो काही छोट्या गरीब मुलांना सुद्धा किन्नरच्या भूमिकेत आणून त्यांचेकडून भीक मागण्याचे काम करवून घेत आहे . एवढेच नव्हे तर काही मुळ किन्नरांची साथ घेवून चालविलेल्या हया त्यांच्या व्यवसायात तब्बल 15 ते 20 पुरुष किन्नरांचा वेष परिधान करून वापर होतं असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.
मार्च महिन्याच्या 11 तारखेला मुस्कान नावाच्या असली किन्नर समूहाने एका व्यापाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात नाच गाण्याचे करार केल्यानंतर ते तिथे गेले असता दुसऱ्या गुटातील कथीत किन्नरांनी काही असली किन्नरांना सोबत घेऊन राजू काचोळे यांनी त्यांचेवर हमला केला. त्यात असली किन्नर केवळ सहा ते सात असल्यामुळे व दुसऱ्या गुटातील जवळपास 25 ते 30 कथीत व काही असली किन्नरांच्या साथीने मिळून राजू काचोळे यांनी त्यांचेवर हल्ला केला. हमल्यात वयाने कमी असलेल्या मुस्कान गटाच्या किन्नराना बेदम मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले.सोबतच त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाळण्यात आले .
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस येवून पोहचले. मात्र ज्या कथीत किन्नरांच्या गुटानी मारहाण केले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे न लावता उलट ज्या किन्नरानी मार खाल्ला त्याच मुस्कान किन्नरांच्या गुटांच्या चार किन्नरावर गुन्हे दाखल करून त्यांचेवर अन्याय केला आहे. याबाबत मुस्कान किन्नरांच्या गुटानी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचेकडे तक्रार दिली आहे.या तक्रारीत चंद्रपूर शहरातील सर्व किन्नरांची वैद्यकीय तपासणी करा,राजू काचोळे यांच्या प्रबोधन ट्रस्टची चौकशी करण्यात यावी, त्यांचेकडे असलेल्या नकली किन्नरांवर लोकांकडून बळजबरीने पैसे वसूल करतात त्यामुळे त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे, आणि वैद्यकीय तपासणीत वैध असणाऱ्या किन्नराना पोलीस विभागामार्फत ओळखपत्र देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या यात केल्या आहेत.
या संदर्भात पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी मुस्कान गटातील किन्नर यांच्या व्यथा ऐकून घेवून हे प्रकरण चौकशी करिता उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे सोपवले असल्याची माहिती आहे .या प्रसंगी तक्रार देणारे मुस्कान यांचेसह स्वीटी. सरौजा.संजना. फेजल. लिजा इत्यादी किन्नर उपस्थित होते.