टोल नाक्यांवरील प्रवास होणार सुखकर ! फक्त 10 सेकंदात काम होणार, पहा NHAIची नवी नियमावली

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये टोल नाक्यावरून प्रवास करत असताना अनेक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. यामध्ये मग लॉंग टाइम वेटिंग असू दे किंवा टोल घेताना लागणारा वेळ असू दे. इथून पुढे मात्र राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरचा प्रवास सुखकर होणार आहे. टोल नाक्यांवर चालकांना दहा सेकंद त्यापेक्षा वेळ जास्त वेळ वाट पहावे लागणार नाही असा दावा नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने केला आहे. NHAI ने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

एवढंच नव्हे तर जर कुठल्याही कारणामुळे टोल नाक्यावर शंभर मीटर पेक्षा अधिक रांग लागली तर वाहनांना टोल न भरता टोलनाका पास करण्याची परवानगी दिली जाईल. असंही नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने म्हंटले आहे. तसंच टोल नाक्यांवर दहा सेकंदात पेक्षा अधिक वेळ लागणार नसल्याचा NHAI ने म्हंटले आहे.

‘या’ पद्धतीचा केला जाणार अवलंब

-NHAI ने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता प्रत्येक टोल नाक्यावर 100 मीटर अंतरावर एक पिवळ्या रंगात रेष ओढली जाईल.
-देशातील प्रत्येक टोल नाक्यावर हे चित्र पाहायला मिळेल.
-NHAI च्या निर्णयामुळे टोक नाक्यांवर लोकांचा वेळ वाया जाणार नाही.
– टोल भरण्यासाठी जास्त वेळ वाटही पाहावी लागणार नसल्याचं बोललं जात आहे.

GPS प्रणालीच्या वापराने होणार टोलनाकामुक्त देश

रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार आहे.
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप
जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार
वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार
तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य

असे चालते जीपीएस (GPS) सिस्टमचे काम?

— ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क
— 20,000 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरते उपग्रह
— तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती
–जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसीव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात
— ऑटोमॅटिक घड्याळ्यांच्या माध्यमातून सॅटेलाईटमार्फत माहिती
— जीपीएस प्रणालीच्या आधारे वाहनाच्या हलचालीवरून आकारणार टोल
— कार, नौका, विमान, सेल्युलर फोनमध्ये सिस्टम वापरण शक्य
— 1970 च्या दशकात अमेरिकेकडून जीपीएस प्रणालीचा विकास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here