पुण्यात चारचाकी वाहनातून प्रवास करत असाल तर मास्क संदर्भात मिळणार ‘हि’ सूट

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | मूखपट्टी म्हणजेच मास्क हा करोना काळात खूप महत्त्वाचा समजला जातो. दुचाकीवरून आणि चारचाकी वाहनांच्या मधून जाताना मास्क घालने अनिवार्य आहे. चार चाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी पुणे महानगर आयुक्तांनी नवीन आदेश काढला असून, काही लोकांना मास्क लावण्यापासून मुभा दिली आहे. जर एकाच कुटुंबातील व्यक्ती चारचाकी गाडीतून प्रवास करत असतील तर त्यांना मास्क वापरण्याबाबत मुभा दिली आहे.

नवीन नियमानुसार जर चारचाकी गाडीमध्ये सर्व व्यक्ती एकच कुटुंबातील असतील तर त्यांना मास्क घालण्यापासून सुटका मिळू शकेल. पण जर चालक हा कुटुंबा बाहेरचा असेल तर सर्वांना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.

वरील दोन्ही नियम हे 22 जानेवारी पासून पुढील आदेश येईपर्यंत, पुणे शहराच्या हद्दीमध्ये लागू असतील. या निर्णयामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये होत असलेल्या वादाला थोडा विराम मिळण्यास उपयोग होईल.मास्क लावणे ही मोठी गरज आहे. सोबतच मास्क हा खूप पातळ नको. चांगल्या कापडाचा मास्क वापरल्याने आपण कोविड विषाणू पासून बचाव करू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here