ऊस तोडणी सुरु असताना सापडली बिबट्याची 3 पिल्लं; जवळपासच होती मादी बिबट्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 कराड : तारुख येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज सोमवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. बिबट्याचा वावर, मानवी वस्तीत शिरकाव, प्राणी व माणसांवर होत असलेले हल्ले यामुळे किरपे, येणके नंतर आता तारूख व कूसूरू भागात शेतकरी, गावकरी चांगलेच धास्तावले आहेत.

तारुख येथे आज ऊसाच्या शेतात बिबट्याची दीड महिन्यापूर्वी जन्मलेली तीन पिल्ले सापडल्याने बिबट्याचा वावर या भागात कायमचा असल्याचे स्पष्ट होत आहे. आज दूपारी पिल्ली दृष्टीस पडताच शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना याबाबतची माहिती दिली. भिसे यांनी घटनेचे गांर्भिय ओळखून वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली.

वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची पिल्ली ताब्यात घेतली. मादी बिबट्या ही जवळपासच होती व ती चिडून आक्रमक होऊ नये म्हणून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर तीन पिलांचे आई सोबत भेट घडवून आणण्यांचे योजना आखण्यात आली, त्यानूसार सायंकाळी 6.30 वाजता सदर शिवारात पुन्हा तीन पिल्ले एका कॅरेट मध्ये घालून त्याच्या आजू बाजूस कॅमेरे लावून ठेवण्यात आले. कॅमेरा लावत असतानाच बिबट्याची मादी निदर्शनास आली, ती त्याच परिसरात घुटमळत होती. त्यामुळे पिल्ले कॅरेट मध्ये ठेवून कर्मचारी व अधिकारी जागेवरून निघून गेले.

यासाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, राठोड, व इतर वनकर्मचारी उपस्थित होते. सापडलेले तीन पिल्लं 1 नर जातीचे असून 2 माद्या आहेत. त्यांचे वजन 2.500 किलो, 2.400, व 2.300 असे अनुक्रमे आहे