हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Trent Boult : न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची गणना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची भांबेरी उडवताना आपण त्याला अनेकदा पहिले आहे. मात्र, नॉटिंगहॅममधील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी बोल्टने धडाकेबाज फलंदाजी करत एक खास विश्वविक्रम आपल्या नावे केला. या कसोटीच्या दुसऱ्या डावात बोल्टने 17 धावा करताना एक विशेष टप्पा गाठला. बोल्ट आता 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
या बाबतीत Trent Boult ने श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनला मागे टाकले आहे. मुरलीधनने कसोटीत 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 98 डावात 623 धावा केल्या आहेत. तर 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना बोल्टने 79 डावात 640 धावा केल्या आहेत.
या लिस्टमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसनने 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 618 धावा केल्या आहेत. हे लक्षात घ्या कि अँडरसन अजूनही खेळत असून तो Trent Boult च्या फारसा मागे नाही. त्यामुळे या फलंदाजीच्या विक्रमासाठी या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकेल. इथे लक्षात घेण्यासारखे आहे कि, या दोन्ही गोलंदाजांनी 11 व्या क्रमांकावर खेळताना कसोटीत अर्धशतके देखील झळकावली आहेत.
या कसोटीच्या दुसऱ्या डावात Trent Boult ने 15 चेंडूत 17 धावा केल्या. यावेळी त्याने इंग्लंडचा कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सच्या एकाच षटकात तीन चौकार देखील लगावले. बोल्टनेही पहिल्या डावात नाबाद 16 धावा केल्या होत्या. यानंतर जबरदस्त गोलंदाजी करत पहिल्या डावात इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले. बोल्टच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 539 धावांवर आटोपला. बोल्टमुळे इंग्लंडच्या शेवटच्या पाच विकेट अवघ्या 66 धावांत पडल्या. त्यांना पहिल्या डावात न्यूझीलंडची 553 धावांची धावसंख्याही पार करता आलेली नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.espncricinfo.com/player/trent-boult-277912
हे पण वाचा :
axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!
Multibagger Stock : ‘या’ शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 2000% रिटर्न !!!
Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
FD Rate : SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने FD वरील व्याजदर वाढवले