Shane Warne : 23 षटकांनंतर 23 सेकंदांसाठी सामना थांबवला, ‘या’ दिग्गजाला अशा प्रकारे वाहिली गेली श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shane Warne : सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळविली जात आहे. याच मालिकेतील पहिला कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरु आहे. या सामन्यादरम्यान दिवंगत दिग्गज फिरकीपटू Shane Warne याला श्रद्धांजली वाहीली गेली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या डावाची 23 षटके संपल्यानंतर स्क्रीनवर शेन वॉर्नची क्लिप दाखविली गेली. त्यानंतर सामना 23 सेकंदांसाठी थांबवण्यात आला. यावेळी सर्व खेळाडूंनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. याशिवाय प्रेक्षकही स्टँडमध्ये उभे राहून टाळ्या वाजवताना दिसून आले.

Cricket fraternity pays tribute to Shane Warne after his demise

क्रिकेटच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी उतरताना Shane Warne 23 नंबरची जर्सी घालायचा. यामुळे सामना 23 षटकांनंतर थांबवण्यात आला. तसेच यानंतर 23 सेकंद टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी मैदानावरील मोठ्या पडद्यावर ‘रिमेम्बरिंग शेन वॉर्न’ नावाची एक व्हिडिओ क्लिप देखील दाखवण्यात आली. आता वॉर्नचे क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन द स्काय स्पोर्ट्स कॉमेंटरी बॉक्सचे नाव बदलून शेन वॉर्न कॉमेंटरी बॉक्स असे करण्यात आले आहे.

हे जाणून घ्या कि, गेल्या महिन्यात 4 मार्च रोजी थायलंड येथे Shane Warne चे निधन झाले. 1999 चा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा देखील वॉर्न सदस्य राहिला आहे. आपल्या जादुई फिरकीने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकून देणाऱ्या या दिग्गज फिरकीपटूला विसरणे शक्य नाही हेच याद्वारे दिसून आले…

Why The Legend Of Shane Warne Will Never Fade Away? | Kyrosports

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://youtu.be/ISWI2OYqwjM

हे पण वाचा :

IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

Bank FD : ‘या’ सरकारी बँकेने वाढवले आपल्या ​​FD चे व्याजदर !!!

Roman Saini : IAS ची नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय; आज आहे तब्ब्ल 15,000 कोटींच्या कंपनीचा मालक

Upcoming cars : इलेक्ट्रिक आणि SUV सहित जूनमध्ये लॉन्च होणार ‘या’ 4 सर्वोत्कृष्ट कार !!!

Leave a Comment