महामार्गावर तिहेरी अपघात : एक कार व दोन ट्रकच्या धडकेत चालक गंभीर जखमी

कराड | कराड जवळ वहागाव- बेलवडे गावच्या हद्दित मंगळवारी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास तिहेरी अपघात झाला आहे. सातारा- कोल्हापूर लेन वरती पुढे चाललेल्या‌ कारने ब्रेक मारल्याने पाठीमागून आलेल एक आयशर व एक ट्रक यांचा तिहेरी अपघात झाला. यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी साई हाॅस्पिटल कराड येथे हायवे अॅब्युलन्सने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सातारा – कोल्हापूर मार्गावर शेवरोलटची एन्जाय कार क्रमांक (एमएच -06- बीई- 5913), ट्रक क्रमांक (केए- 25-अो- 5547) व (एमएच -04-जीएफ- 8613) या तीन वाहनांचा अपघात झाला आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती.

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होवून ट्रकमध्ये अडकलेल्या जखमी चालकास बाहेर काढण्यात आले. यावेळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, सिकंदर‌ उघडे, महामार्ग पोलिस स्टेशनचे कर्मचारी व तळबीड पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी मदत केली.