तुकडोजी महाराजांचा स्मृतिदिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमित येवले | आधुनिक काळातील संत माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ यांचे आज पुण्यस्मरण. तुकडोजी महाराजांनी कीर्तनांचा वापर जातीभेद व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अत्यंत प्रभावीपणे आयुष्यभर केला होता. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. ग्रामगीतेतून आत्मसंयमाचे विचार त्यांनी मांडले.

विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था व राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर अवलंबून असते , असे ते आपल्या कीर्तनातून नेहमीच सांगत आले. ११ ऑक्टो १९६८ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा देहांत दिवस होय.

Leave a Comment