Tulashi Benefits | उन्हाळ्यात ग्लोइंग आणि पिंपल फ्री स्किन हवी असेल, तर तुळशीच्या पानांचा करा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tulashi Benefits | तुळस ही धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. त्वचेसाठी देखील तुळस खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात जर तुम्हाला पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या होत असतील. तर या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुळस ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीमुळे आपल्या आरोग्याला तसेच तुमच्या स्किनला देखील खूप जास्त फायदे होतात. आता आपण तुळशीमुळे (Tulashi Benefits) आपल्या त्वचेला नेमके कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

लालसरपणा कमी होते | Tulashi Benefits

तुळशीमध्ये शुद्धीकरणाचे गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेचे छिद्र खोलवर स्वच्छ करण्याची क्षमता तुळशीमध्ये असते. तुम्ही तुळशीची काही पाने घ्या आणि ती पाण्यात घालून उकळा. थंड झाल्यावर हे पाणी तुम्ही एका टोनर बॉटलमध्ये भरून ठेवा. रोज फेस वॉश केल्यानंतर तुम्ही हे टोनर वापरू शकता. असे केल्यामुळे थोड्या दिवसातच लालसरपणा कमी होईल आणि जळजळ देखील कमी होईल.

पिंपल्स पासून सुटका

उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना पिंपल्स येतात. परंतु तुळशीमुळे हे पिंपल दूर होऊ शकतात. तुम्ही तुळशीची पाने बारीक करून त्यात एक चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी घालून ते चेहऱ्याला लावा. यामुळे पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग देखील दूर होतात.

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर होतील

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी तुळशीचा वापर खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला त्यात थोडी कडुलिंबाची पाने आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावावे लागेल आणि 10 मिनिटांनी धुवावे लागेल उन्हाळ्यात अनेकांना त्वचेवर अतिरिक्त तेलाची समस्या असते, ती समस्या देखील दूर होते.

डाग दूर होतात

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात परंतु मागे राहिलेले डाग अनेकदा लोकांसाठी डोकेदुखी बनतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही अनेक उत्पादने वापरून कंटाळा आला असेल, तर यावेळी तुम्ही तुळस वापरून पाहू शकता. यासाठी तुळशीची पाने, संत्र्याची साल आणि गुलाबपाणी मिक्सरमध्ये एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावावी. हळुहळु हे मुरुमांचे ठसे कमी होऊ लागतील.