हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कराड तालुक्यातील आणे गावचा सुपूत्र तुषार उत्तमराव देसाई याने युपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. त्याने 224 वा नंबर पटकावला. सध्या तो भोपाळ (मध्य प्रदेश) येथे नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे.तुषार यांच्या यशाने कराडकरांची छाती अभिमानाने फुगली आहे.
तुषार देसाई याचे प्राथमिक, माध्यमिक तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण कराडमधील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर पुणे येथील एसईओपी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून तो भोपाळमध्ये नोकरीस आहे. या दरम्यान त्याने युपीएससी परीक्षेची तयारी केली होती. 224 वी रँक मिळवून त्याने युपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे.
तुषार याचे वडील उत्तमराव देसाई हे कराडच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत. दोन वर्षापुर्वी तुषारचा मावस भाऊ गिरीश यादव हा देखील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. तामिळनाडू केडरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून सध्या त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.
कराड तालुक्यातील आणि कोळे विभागातील तो पहिला आयपीएस अधिकारी ठरल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, एक दोन वेळा अपयश आल्यानंतर देखील खचून न जाता जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करा, मग यश नक्की मिळत असा मूलमंत्र तुषार यांनी दिला.