औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा गुणपत्रिका 20 ऑगस्टपासून वितरित केल्या जाणार आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका यांचे वितरण करावे अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.
राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानूसार सदर निकालाची गुणपत्रक व तपशीलवार गुण दर्शवणारे अभिलेख उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना वितरणाबाबत कार्यवाही करण्यात यावी.
प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता जादा वितरण केंद्र निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून खिडकीत संख्या वाढवून गुणपत्रिका हस्तांतरित कराव्यात. तसेच पॅनल फॉर्म स्वीकारण्यात येणार आहे. निकालाचे साहित्य शाळा-महाविद्यालयांना जिल्हा वितरण केंद्रावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.