लखनऊ । रविवारी ATS ने राजधानी लखनऊमधील काकोरी भागात अल-कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांकडून ATS ने प्रेशर कुकर बॉम्ब आणि परदेशी शस्त्रास्त्रांसह काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. त्याचबरोबर काही नकाशे आणि कागदपत्रे जाळल्याची बाबही समोर आली असून, त्याबद्दल ATS तपासणी आणि चौकशी करीत आहे. यूपी ATS च्या मते, त्यांचा हँडलर पाकिस्तानी आहे आणि त्यांचा संबंध अल कायदाशीही असू शकतो. त्यांचा शोध घेतला जात आहे.
ATS नुसार हे दहशतवादी काकोरी भागात राहून मोठे नियोजन करीत होते. जेथे ATS ने या दहशतवाद्यांना अटक केली आहे तेथे तीन घरे आहेत. पहिले घर शाहिद आणि गुड्डू यांचे असल्याचे सांगितले जात आहे. गुड्डू पाच वर्षे सौदी अरेबियात वास्तव्यास होता आणि टेलीग्राम अॅपद्वारे तो अल कायदाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरे घर सिराजचे असून तिसरे घर रियाझचे आहे. या तिन्ही घरांत गुप्त तळ बांधले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. आता ATS हे तळघर उघडण्याचा प्रयत्न करीत आहे.
भाड्याच्या घरात राहून मोठे नियोजन करण्याची तयारी
मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी यूपी ATS ने छापा टाकून एका संशयिताला अटक केली. रविवारी सकाळी ATS च्या पथकाने दुबग्गा येथील सिराज, रियाज आणि शाहिद उर्फ गुड्डू यांच्या घरी पुन्हा छापा टाकला. या छापेमारी दरम्यान शाहिद उर्फ गुड्डू आणि वसीम यांना कॉलनीतून अटक केली आणि त्यांची चौकशी केली. यानंतर ATS वसीम नावाच्या युवकाला अटक करून त्याच्याबरोबर नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद आपल्या कुटुंबासमवेत दुबग्गाच्या सीता विहार कॉलनीत राहतो. त्याने भाड्याने पाच घरे दिली असल्याचे सांगण्यात आले.
Lucknow ATS conducts searches in Kakori. Details awaited. pic.twitter.com/gPcqRbKMmL
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 11, 2021
काशी, अयोध्या आणि मथुराची सुरक्षा वाढ
या क्षणी हे स्पष्ट झाले आहे की, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्हे त्याच्या निशाण्यावर होते. काशी, अयोध्या आणि मथुरामध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक राजकारणीही त्यांच्या निशाण्यावर होते. सध्या यूपी ATS मध्ये शोधमोहीम सुरू आहे. जवळपासची घरेही रिकामी केली आहेत.
दोन प्रेशर कुकर आणि टाइम बॉम्ब जप्त केला
आयजी जीके गोस्वामी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत दोन प्रेशर कुकर बॉम्ब, टाईमबॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ATS ची टीम एका आठवड्यापासून दहशतवाद्यांचा शोध घेत होती. अटक केलेल्या अतिरेक्यांचे अल कायदाबरोबरचे संपर्क चव्हाट्यावर आले आहेत. बॉम्ब पथकाने स्फोटक निष्क्रिय केले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा