Monday, January 30, 2023

शहरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याचा धोका

- Advertisement -

औरंगाबाद | गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे सर्वत्र हिरवगार वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आता साथीचे रोग, डेंग्यू, मलेरिया, ताप अशा रोगाचे रुग्ण वाढत आहेत.

महापालिकेच्या वतीने 1 ते 30 जुन दरम्यान हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन विशेष मोहीम घेण्यात आली होती. परंतु या मोहिमेनंतर पाऊस सुरु झाला. आणि मोकळ्या जागेवर टाकलेला कचरा, कुजलेला कचरा आणि खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे.

- Advertisement -

महापालिकेकडून घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेचा काहीच फायदा झाला नाही. आता पाऊस सुरु झाला असून डासांचे प्रमाण वाढले आहे. मोहिमेची गरज आता पाऊस पडल्यावर होती. मनपाने आता यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.