औरंगाबाद | सोयगाव तालुक्यात नाकाबंदी दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास सुमारास सव्वा लाखाचे चंदन जप्त करून चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे.
सोयगाव तालुक्यातील पोलिसांना नाकाबंदीच्या दरम्यान 1 लाख 25 हजारांचे चंदन आढळून आले आहे. पोलिसांनी चंदनासह 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. रविवारी पहाटेच्या सुमारास सोयगाव पोलीस नाकाबंदी करत होते. त्या दरम्यान सकाळी एक महिंद्रा पिकअप (एमएच २८ एबी २५६४) या वाहनाचा संशय आल्यामुळे त्याची तपासणी केली असता पन्नास किलो चंदन आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी अब्दुलखां पठाण गौसखां गफूरखां पठाण (वय ४५) आणि जकीर भोकरदन, (जि. जालना) यांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सपोनि सुदाम शिरसाठ, सागर गायकवाड, रवींद्र तायडे, संदीप चव्हाण, रोहन शिंदे, भूषण चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.