औरंगाबाद | कार्डियाक रुग्णवाहिका मानपाच्या यांत्रिकी विभागात दाखल झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिका खरेदीसाठी राज्य शासनाने महापालिकेला सीएसआर निधीतून दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. या सहा रुग्णवहीका खरेदी केल्या उर्वरित कार्डियाक रुग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महापालिकेला शहर बसचा वापर करून रुग्णांना ने-आण करावे लागले मानपाच्या आरोग्य विभागाने भाडेत्वावर रुग्णवाहिका घेतल्या होत्या. मात्र, त्याचा खर्च ही बराच झाला. त्यामुळे स्वतःच्या रुग्णवाहिका असाव्यात म्हणूण शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाने सीएसआर मधून दीड कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.
मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या निधीतून दोन कार्डियाक आणि सहा सद्या पद्धतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शासनाच्या जे. एम. पोर्टलवरून दोन कार्डियाक आणि सहा सद्या पद्धतीने रुग्णवाहिका खरेदी प्रकिया राबविली. दोन कार्डियाक रुग्णवाहिका शूक्रवारी मानपाच्या यांत्रिकी विभागाला मिळाल्या.