सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
पुसेसावळी येथे सह्याद्री कारखान्याच्या दोन महिला व दोन पुरूष ऊसतोड मजुरास उसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीबाबत औंध पोलिस ठाण्यात पुसेसावळी येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेसावळी येथील एका शिवारात ऊसतोड सुरू होती. तेव्हा ऊसतोड मजुराने ट्रेलरमध्ये ऊस भरताना सपोर्टसाठी नारळाच्या झाडाच्या झावळ्या लावलेल्या होत्या. नारळाच्या झावळ्या तोडल्याच्या कारणावरून भैय्या उर्फ अमेय बाबासो लवळे (रा. पुसेसावळी, ता. खटाव) या युवकाच्या विरोधात औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणात विश्वास अर्जुन पडोळकर, सिदराया मल्हाप्पा तिकोडे, माव्वसा विश्वास पडोळकर आणि राजाक्का अर्जुन पडोळकर (रा. कुताळवाडी, ता. जत) या चार ऊसतोड मजुरांना मारहाण केलेली आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुसेसावळी (ता. खटाव) गांवचे हद्दीत पुसेसावळी ते वडगांव ज. स्वा. जाणाऱ्या रोडचे कडेला असलेल्या स्मशानभुमीच्या अलिकडच्या शेतात ही घटना घडली. फिर्यादीने अमेय बाबासो लवळे याने नारळाच्या झावळ्या का तोडल्या कारणावरून हाताने व उसाचे दांडक्याने मारहाण करून मला पाठीवर, डावे पायावर हातावर मारुन दुखापत केली आहे. तसेच माझी पत्नी व आई यांनी माझे मुलास का मारले असे विचारताच अमेय लवळे याने हाताने मारहाण करून शिवीगाळ करुन दमदाटी केली केल्याची तक्रार दिली आहे.