अंडी उधार दिली नसल्याच्या कारणातून दुकानदाराचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साताऱ्यात अंडी उधार दिली नसल्याच्या करणातून एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. ही घटना रात्री यवतेश्वर रस्त्यावर पाॅवर हाऊस जवळ घडली. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुणांचं सत्र सुरूच आहे. आता किरकोळ कारणावरून पुन्हा खून झाल्याने जिल्ह्यात दहशत पसरली आहे. रात्री झालेल्या या खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दुकान चालक बबन गोखले यांना संशयित आरोपी शुभम कदम,सचिन माळवे यांनी उधार अंडी मागितली. मात्र दुकान मालक यांनी उधार देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या या संशयित आरोपी यांनी या दुकान मालकास मारहाण केली. यातच या दुकान मालकाचा मृत्यू झाला आहे.

बबन हणमंत गोखले वय 42 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मागील तीन दिवसात शहरात झालेली खुनाची दुसरी घटना आहे. दोन्ही खुनातील संशयित आरोपी पकडले आहेत. अशा घटनांमुळे रात्री दहानंतर पेट्रोलिंग वाढवण्यात येईल. शहरात व जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने यंत्रणा सजग करत आहेत. शहरातील दोन्ही खुनाच्या गुन्हेगारांना शिक्षा होईल, असा तपास करण्यात येईल,” अशी माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’