औरंगाबाद प्रतिनिधी । गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार जिन्सी गुन्हे शोध पथकाने दोन आरोपी ताब्यात घेवुन कारवाई करत त्यांचेकडुन दोन मोटारसायकल आणि तीन हातगाडी जप्त केल्या आहेत. जिन्सी पोलीस ठाणे येथील दोन आणि जवाहर नगर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा यामुळे उघडकीस आला आहे.
गुन्हे शोध पथकाने वडील अरबाज कुरेशी वय ४० आणि मुलगा अहेमद कुरेशी वय १९ वर्ष रा संजयनगर औरंगाबाद या दोघांना ताब्यात घेत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याच्या मॅकेनिक मित्रासह (हुजेब खान, रा. संजय नगर) सिग्मा हॉस्पिटल समोरुन २३ नोव्हेंबर रोजी गणेश दिगंबर अंभोरे वय २३ वर्ष धंदा नोकरी रा उल्कानगरी ओरंगाबाद यांची हिरो कंपनीची गाडी चोरल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेली ५०हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची गाडी जिन्सी पोलिसांनी जप्त करुन जवाहर नगर पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्याकडे दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडीस आणला आहे. आरोपीला जवाहर नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी जिन्सी पोलिसांच्या कलम ३७९ या गुन्हयातील पोलीस कस्टडीमध्ये असलेला आरोपी शेख फारुक, पिता शेख कादर वय २७ वर्ष, धंदा मजुरी रा. रहीम नगर, औरंगाबाद याच्या ताब्यातुन तीन हातगाड्या ज्याची अंदाजे किंमत १६ हजार रुपये व एक टीव्ही एस कंपनीची ज्युपिटर गाडी ज्याची अंदाजे किंमत २० हजार रुपये जप्त केली आहे.
जिन्सी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगीरी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,पोलीस उपआयुक्त डॉ.राहुल खाडे सहायक पोलिस आयुक्त सिडको निशीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे,पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, पोलीस नाईक संजय गावंडे,पोलीस शिपाई,गणेश नागरे,सुनील जाधव यांनी केली आहे.