सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील दहिवडी – बिदाल रोडवर झालेल्या अपघातात भाऊ बहीण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात शुभांगी पाटोळे (वय 23) व अविनाश जाधव (वय 18) हे दोघे जागीच ठार झाले असून लहान बाळ सुदैवाने बचावले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातात मृत्युमुखी पावलेले अविनाश जाधव हे आपल्या बहिणी शुभांगी पाटोळेसोबत दुचाकीवरून बिदालकडे जात होते. ते बिदालच्या दिशेने जात असताना दहिवडी बिदाल नजीक शेडगेवाडी हद्दीत त्यांची त्यांची गाडी आली असताना समोरून आलेल्या इस्टिम गाडीने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये दिघंची जागीच मृत्यू झाला.
या अपघातात बहीण भाऊ जागीच ठार झाले तर त्यांच्या सोबत असणारे लहान बाळ सुदैवाने बचावले. बाळाला दुखापत झालेली असून त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे. या घटनेचा अधिकचा तपास सहायक पोलीस निरीक्षक तासगावकार करत आहेत.




