धक्कादायक ! एकाच साडीने गळफास घेऊन दोन बहिणींची आत्महत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – शनिवारी लातूर शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीने गळफास घेऊन दोन मावस बहिणींनी आत्महत्या केली आहे. या दोन बहिणींनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन बहिणींनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या दोघी बहिणींनी आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला होता. एमआयडीसी पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

गीतांजली बनसोडे आणि धनश्री क्षीरसागर असे आत्महत्या केलेल्या बहिणींची नावे आहेत. या दोघी लातूर शहरालगत हरंगुळ रोड परिसरातील गोविंद नगरमध्ये त्या आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. शनिवारी सकाळी 10 ते 11 च्या सुमारास दोन्ही बहिणी कपडे धुवायचे कारण सांगून तळमजल्यावरून घराच्या वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत दोघींनी एकाच साडीने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर बराच वेळ झाला तरी मुली खाली आल्या नाहीत म्हणून घरातील एका व्यक्तीने वरच्या मजल्यावर जाऊन खोलीचा दरवाजा वाजवला. पण खोलीतून काहीही प्रतिसाद आला नाही.

यानंतर त्याने खिडकीतून आतमध्ये डोकावले असता दोन्ही बहिणींचा गळफास लावल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दोघींनी एकाच साडीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येपूर्वी मृत बहिणींनी सुसाइड नोटही लिहिली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं गूढ बनले होते. या प्रकरणी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत.दोन्ही बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या पंकज सुतार या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या मृत बहिणी आठ दिवसांपूर्वी हरंगूळ येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर पोलिसांनी या दोघीना पुण्यातून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. मात्र त्यांनी घरी परतल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली.