दोन दुचाकींच्या भिषण अपघातात पती – पत्नीसह तिघे ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वरोरा प्रतिनिधी | शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या टेमुर्डा – शेगाव मार्गावरील खेमजई गावाजवळ दोन दुचाकींच्या झालेल्या भिषण अपघातात पती – पत्नी आणि आणि एक युवक ठार झाल्याची घटना आज ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातातीत पती – पत्नी जागीच ठार झाले तर युवकाचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.

राजु सावसागळे (३०), भाग्यश्री सावसागळे (२५) आणि प्रशांत उर्फ राजु जांभुळे अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार राजु सावसागळे हे आपली पत्नी व मुलासह दुचाकीने शेगाव येथून टेमुर्डाकडे जात होते. तर विरूध्द दिशेने प्रशांत उर्फ राजु श्रावण जांभुळे (२८) हा कवडू श्रावण जांभुळे (५०) आणि श्रावण जांभुळे (६०) यांच्यासह आसाळा या गावावरून शेगावकडे येत होता. दम्यान दोन्ही दुचाकींची खेमजई गावाजवळील वळणावर जोरदार धडक बसली. यामध्ये राजु आणि भाग्यश्री जागीच ठार झाले. जगदिशला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

गंभीर जखमी प्रशांतवर वरोरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. कवडू आणि श्रावण जांभुळे यांचीही प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहेत.

Leave a Comment