दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये चोरीची ( stole sarees) घडली आहे. यामध्ये वसईतल्या एका साडीच्या दुकानात दोन महिलांनी जवळपास 90 हजारांच्या साड्यांची चोरी ( stole sarees) केली आहे. या महिलांचा हा संपूर्ण प्रताप दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके ?
शुक्रवारी 27 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वसईतील स्टेला संकुलातील सद्गुरूज हातमाग साडीच्या दुकानात दोन महिला आपल्या मुलीच्या लग्नासाठी साड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. साडी पसंत करताना अतिशय हुशारीने, जिथे एखादी महिला साडी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष वेधून घेते, त्याचवेळी दुसरी महिला दुकानदारानं दाखवलेली साडी आपल्या साडीच्या आत लपवायची. दोन्ही चोरट्या महिलांनी दोन ते तीन वेळा दुकानदाराला बोलण्यात अडकवून नऊ सिल्क पैठणी साड्यांची चोरी केली ( stole sarees) आणि साडी न घेता दुकानातून परत गेल्या.

या दोन्ही महिलांचा हा संपूर्ण प्रताप दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारावर दुकान मालक चेतन भट्ट यांनी वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात या महिलांविरोधात चोरीची ( stole sarees) तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून सीसीटीव्हीच्या आधारे या महिलांचा शोध घेण्यात येत आहे.

हे पण वाचा :

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

‘वर्दी उतार के आओ, तुम को देख लेता’

शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी

चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात ! घटना CCTVमध्ये कैद

Leave a Comment