पोलीस बनण्याचे स्वप्न अपुरेच राहिले, सरावादरम्यान दोन युवकांचा अपघाती मृत्यू

0
602
Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (Accident) झाला आहे. या दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिंगोली शहरामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या दोन युवकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू (Accident) झाला आहे. अनिल भगवानराव आमले व गणेश परमेश्वर गायकवाड अशी या अपघातात (Accident) मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही वसमत शहरातील रहिवासी आहेत. वसमत ते कवठा रोडवर आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वसमत शहरातील हे दोघे युवक मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते. हे दोघे सकाळी वसमत शहरातून कवठा रोड परिसरात व्यायाम व शारीरिक कसरत करण्यासाठी जातात. आज सकाळी रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने अनिल भगवानराव आमले व गणेश गायकवाड यांना जोराची धडक (Accident) दिली. गाडीच्या धडकेमुळे दोघांचाही घटनास्थळी जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी यांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले. पोलीस या प्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय

देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? शिंदे म्हणतात….

शिवसैनिकांनो, मुंबई असो वा ठाणे…; दीपाली सय्यद यांचे भावनिक पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here