उस्मानाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी चे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी न.प. चा कारोबार निष्क्रीय व भ्रष्ट असल्याचा आरोप केला. परंतु हा आरोप सरासर खोटा आहे. उजनी ते उस्मानाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची टेस्टींग चे काम सुरू आहे. त्यामुळे लोकांना पाणीपुरवठा करण्यास उशीर होत आहे. लोंकाना माहित होण्यासाठी मुद्यामुन या पत्रकार परिषदचे आयोजन केले आहे. न.प.च्या भ्रष्ट कारभारामुळे नाही तर पाणीपुरवठा करणा-या पाईपलाईन च्या टेस्ट मुळे पाणी येण्यास उशीर होत आहे, असे उत्तर नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिले.
दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादी चे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शहरातील पाणी प्रश्र सोडविण्यासाठी लवकरात, लवकरात निर्णय घेण्याची मागणी केली होती. यावेळी निवेदनात न.प. च्या कारोबार संदर्भात आरोप पण केला होता. त्याचे उत्तर देण्यासाठी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर ने सांगितले की, उजनी पाणीपुरवठा योजना के संदर्भात त्यांना माझ्याशी बोलने त्यांना उचित वाटले नाही, कारण की उजनी पाणीपुरवठा योजना करतेवेळी मी त्याच्या बरोबर होतो. यावेळी राष्ट्रवादी चे ४ ते ५ नगरसेवक उजनी संदर्भात बैठक आयोजीत केल्यानंतर ही त्या बैठकीला ते येत नव्हते कारण त्यांना उदय निंबाळकर यांनी उजनी पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मी कॉंग्रेसच्या कांही नगरसेवकांना बरोबर घेऊन या योजनेसाठी सारखा पाठपुरावा करत राहिलो. नाहीतर त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी ही योजना रद्द करण्याच्या बेतात होते.
२२ ऑगस्ट २००९ ला या संदर्भात बैठक झाली व २४ ऑगस्ट २००९ ला नागाअर्जुन कंपनीला या कामाचे वर्क ऑडर दिले. विशेष बाब ही आहे की, या कामाचे उद्घाटन कार्यक्रमास मला येऊ नये असे सुचविले होते. त्यामुळे मी या कार्यक्रमाकडे फिरकुन ही बघितले नाही. परंतु या योजनेचा आर्थिक निधीचा दुसरा हप्ता आणण्याची वेळ आल्यानंतर आ. पाटील यांनी मला पाठविले होते. पण आता मला निष्क्रीय व भ्रष्ट कारबार करत असल्याचा आरोप करून शहातील सध्या पाणी टंचाईला मला जिम्मेदार ठरवित आहेत हे चुकीचे आहे. अटल अमृृत योजना नगर परिषदेसाठी मंजुर झाली, ही योजना एमजेपीला न देता ती नगर परिषदच्या माध्यमातून खजगी यंत्रणाद्वारा प्रस्ताव केला असता तर तो योग्य झाले असते. उजनीतून १६ एमएलडी पाणी मिलने आवश्यक होते. परंतु त्या ऐवजी रूईभर प्रकल्पातून ५ एमएलडी व तेरणा प्रकल्पातून ५ एमएलडी त्याच्यामध्ये मिसळून १० एमएलडी पाणी उजनीतून कमी उचण्याची वेळ आली आहे, असे नगराध्यक्ष ने सांगितले.