Wednesday, June 7, 2023

खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती – मोदी

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती असल्याचे वक्तव्य पंतपर्धान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशाच्या चौकीदाराचा आत्मसन्मान हा मतदारांच्या हातात असल्याचे मोदी म्हणाले. नाशिक येथील आयोजीत प्रचारसभेत मोदी बोलत होते.

शेतकरी आणि बाजारपेठ यातील मध्यस्थ दलाल हे कायम फायद्यात होते. त्यांना आम्ही धक्का दिल्याचे मोदी म्हणाले. लोकांच्या आशीर्वादाने भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची आमची वृत्ती आहे. ही हिम्मत मतदारांनी दिली असल्याचे मोदी म्हणाले.

लोकसभेच्या रणांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील प्रचार सभेतही मोदींनी पवारांवर तोफ डागली. मी काही बोललो की काही लोकांना करंट लागतो, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.