‘हरलो आहे, पण थांबलो नाही!’ पराभवानंतर उदयनराजेंचं ट्वीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या पोट निवडणुकीत उतरलेल्या उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंच्या धक्कादायक पराभव केलाय. विधानसभे बरोबरच झालेल्या या लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर सर्व राज्याचे लक्ष् लागले होते. साताऱ्यातील जनतेने उदयनराजेंना नाकारत श्रीनिवास पाटलांच्या पारड्यात वजन टाकल्यानंतर, उदयन राजेंनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यात.

त्यांनी केलेल्या ट्वीट मध्ये ते म्हणतायत की, ”आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर.” अशा भावना उदयनराजेंनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्यात मोठी लढत झालेली पाहायला मिळालीय. श्रीनिवास पाटील यांनी बाजी मारत सुमारे 87 हजार 717 मतांनी उदयनराजेंचा पराभव केलाय. श्रीनिवास पाटील यांना 6 लाख 36 हजार 620, तर उदयनराजे भोसले यांना 5 लाख 48 हजार 903 मते मिळाली आहेत.