उदयनराजेंकडून 26/11 मध्ये शाहिद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहिद झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देशभर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. साताऱ्यात देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी शहिद अशोक कामटे उद्यान येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले.

यावेळी खा. उदयनराजे भोसले यांच्यासह सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी उपस्थिती लावली. खा. भोसले यांनी शीड अधिकारी अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण केले.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षं उलटली आहेत. या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांना वीरमरण आले. त्यांच्या नावाने सातारा येथे उध्यान उभारण्यात आलेले आहे.