Sunday, April 2, 2023

अन् साताऱ्यात खराब रस्त्यांवर अवतरले गदाधारी यमराज

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे बसले असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याबाबत पालिका प्रशासनास अनेकवेळा निवेदन देऊनही पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सातारा येथे आज अनोख आंदोलन करण्यात आले. पालिकेने निकृष्ट दर्जाचे रस्ते केले असल्याने राजवाडा येथे यमराज आणि त्यांच्या दोन दूताच्या वेशभूषेत फिरून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेचा निषेध केला.

- Advertisement -

सातारा येथील राजवाडा परिसरात आज सकाळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित जमले. यावेळी कार्यकर्त्यांमधील काहींनी यमराज तर काहींनी दूतांची वेशभूषा परिधान केली. तसेच त्यांनी सातारा येथील राजवाडा परिसरापासून पोवई नाक्यापर्यंत फिरत पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना यमराज व दूतांच्या वेशभूषेत पाहताच नागरिकांनीही गर्दी केली. यावेळी राजवाडा बसस्थानक परिसरात तसेच काही ठिकाणी रस्त्यावर झोपून यमराज व दूतांच्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.