साताऱ्यात डाॅल्बी वाजली : आले रे… आले रे… आले… उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्सव काळात डॉल्बीबंदी उठवली पाहिजे असं सांगत डॉल्बी वाजलीच पाहिजे असा इशाराच प्रशासनाला दिला होता. आता साताऱ्यात नवीन खरेदी केलेल्या जवळपास 1 कोटी किमतीच्या डॉल्बी सिस्टीमचे पूजन खुद्द उदयनराजे यांनी करत डाॅल्बी वाजणार असल्याचे पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये आले रे… आले रे… आले… उदयनराजे गाण्यांवर काॅलरही उडवली. उदघाटनानंतर डाॅल्बी वाजली मात्र, उत्सवात वाजणार का याकडे आता सातारकरांचे लक्ष लागून आहे.

सातारा नगर पालिकेचे माजी उनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी उदयनराजेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चक्क लाखो रुपयांची डॉल्बी सिस्टीम विकत घेतली. या डाॅल्बीचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या करण्यात आले. यावेळी उदयनराजेंच्या नावाने तयार करण्यात आलेले गाणे डॉल्बी सिस्टीमवर लावण्यात आले होते. उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत हातवारे करत कॉलर उडवून तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला.

पोलिस प्रशानाने कोर्टाचे आदेश व कायदा सुवव्यवस्था राखण्यासाठी डाॅल्बी व डीजे वाजवण्यावर बंदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सिस्टीम मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यावर छ. उदयनराजे यांनी परखड भूमिका घेत, शासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका देखील केली होती. तसेच डाॅल्बी वाजलीच पाहिजे, असे ठणकावूनही सांगितले.