Wednesday, March 29, 2023

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी करण्यात आली वीजचोरी; महावितरणाने केली कारवाई

- Advertisement -

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याअगोदर एक विचित्र प्रकार घडला आहे. आदित्य यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त नवीन सुभेदार या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वीज चोरी (electricity theft) करण्यात आली आहे. या वीज चोरीचा (electricity theft) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक नेते दीपक कापसे यांनी आदित्य ठाकरे यांना तान्या पोळ्यानिमित्त नागपूरला बोलावले होते.

- Advertisement -

या आयोजित कार्यक्रमासाठी लागणारी वीज ही चोरीच्या (electricity theft) मार्गाने घेतली असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात विजेच्या दोन खांबा दरम्यानच्या तारांवर आकडे टाकून वीज घेण्यात (electricity theft) आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. महावितरणाला या प्रकाराची माहिती मिळताच मंडप डेकोरेशन कंत्राटदार मनोहर बनते यांच्यावर कारवाई करत आठ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वीच नागपुरातील गजानन नगर परिसरात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सभेच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. तेव्हाही सभेसाठी जवळच्या खांबावरून वीज चोरल्याचं (electricity theft) उघड झालं होतं. त्यानंतर महावितरणने आयोजकांवर दंडात्मक कारवाई केली होती.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत

Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!

‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…

Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!

दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय