सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून साताऱ्यातील सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली जाते. त्यांना दुचाकी व चारचाकी गाडयांचे विशेष प्रेम असल्यामुळे ते अधूनमधून साताऱ्यातून फेरफटकाही मारतात. त्यांनी नुकतीच साताऱ्यात 007 ही बुलेट चालविली आहे. निमित्त होतं ते म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेच्या रॅलीचे होय. या शोभयात्रे उदयनराजेंनी सहभाग नोंदवत स्वतः दुचाकी चालविली.
साताऱ्यात शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या दिनानिमित्त काल शोभयात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमास खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी सातारा शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीस त्यांनी बुलेटवरून सहभाग घेतला. ही शोभायात्रा पाहण्यासाठी राजपथावर दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त साताऱ्यात श्री शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. राजधानीचा मान मिळवणाऱ्या सातारा शहरात मंगळवारी सायंकाळी साडे तीनशे दुचाकींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रॅलीत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उदयनराजे म्हणाले, आज 350 वर्षे झाली. या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वर्षात आपण पदार्पण करतोय. शोभायात्रेत अग्रभागी असलेली शिवरायांची प्रतिमा भगवे वेषधारी मावळे आणि शिवरायांच्या जयघोषाने शिवकाळ अवतरल्याची प्रचिती आली . शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने साडेतीनशे व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 27 मे ते 2 जून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मशाल महोत्सव, वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शहरात 350 दिवसांची भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रा सुरु होण्यापूर्वी पोवई नाका वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांकडून अभिवादन केले यानंतर शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा पोवईनाका शाहू चौक ते राजवाडा अशी काढण्यात आली यात्रेत सहभागी भगवे ध्वजधारी मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.