सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खासदार उदयनराजे भोसले यांची कायम जनतेशी नाळ घट्ट असलेली अनेक उदाहरणे आहेत. सातारा शहरात विविध विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम आटपून ते घरी जात असताना त्यांनी मल्हारपेठ परिसरात वकील आजिजभाई बागवान यांच्या घरी भेट दिली. यावेळी आजिजभाई यांच्या पत्नी रजीया बागवान यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन अंत्यविधीसाठी निघालेल्या जनाजाला त्यांनी खांदा दिला. यामधून खासदार उदयनराजे यांच्या माणुसकीचे दर्शन सातारकरांना अनुभवायला मिळाले.
खासदार उदयनराजे आणि सातारचे एक वेगळेच नाते आहे. याची प्रचिती अनेकदा येते. उदयनराजे भोसले आणि आजिजभाई बागवान यांच्यात खूप वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. यामुळे उदयनराजे थेट त्यांच्या घरी गेले. त्यावेळी उदयनराजे यांनी रजीया बागवान यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर मुस्लीम समाजातील रजिया बागवान यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.
उदयनराजेंनी अंत्यविधीसाठी निघालेल्या जनाजाला दिला खांदा
मुस्लिम समाजाच्या अंत्ययात्रेत झाले सहभागी pic.twitter.com/GmN1qRMXma
— santosh gurav (@santosh29590931) March 12, 2023
उदयनराजे भोसले सुरुवातीला नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले होते. साताऱ्यातील ज्या वार्डातून विजयी झाले होते. त्या ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या अधिक होती. हा समाज त्यांच्या पाठीमागे कायम राहिला आहे. सातारा शहरातील मुस्लीम मतदार देखील गेली अनेक वर्ष उदयनराजे यांच्या पाठिशी राहिले आहेत. सातारकरांच्या आनंदाचा असो किंवा दुःखाचा उदयनराजे त्यात सहभागी होतात. याचा या माध्यमातून पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.