‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावर उदयनराजे सडेतोड भुमिका घेणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजप नेते जयभगवान गोयल यांनी रविवारी नरेंन्द्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर देशभरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. अनेकांनी भाजपच्या सदर कृत्याचा निषेध केला आहे. आता शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपण सडेतोड भुमिका घेणार असल्याचे जाहिर केले आहे.

उदयनराजे भोसले यांनी आपण मंगळवारी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर आपली प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले आहे. ट्विट करुन भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. उद्या मंगळवार दि १४ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत असं भोसले यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावर प्रखर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल राऊत यांनी केला होता.